महायुतीकडे ओरिजनल कोण? सगळे आपली संस्थानं वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

”नगरचे आमदार कशाप्रकारे जिंकतात? त्यांच्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात. अचानक ते कसे हिंदुत्ववादी होतात? हे इथल्या जनतेला चांगलेच माहित आहे. या जिल्ह्यात ओरिजनल कोण आहे? सगळे मूळचे काँग्रेसवाले. आता आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपूट घालून भाजपात गेले. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे हिंदुहृदयसम्राटांच्या पायाशी बसायचे. यांना काही पक्ष वगैरे नसतो. जिथे सत्तेची हवा आहे तिथे हे जात असतात”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नगरमधील भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे.

संजय राऊत हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीच्या हॉटेल सन अँड सेंड येथे अहिल्यानगर शहर शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला. ग्रामीण जिल्हा शिवसेनेच्या मेळाव्या करिता ते शिर्डी येथे आले होते. ”शिर्डी लोकसभा मतदारसंघात 20 वर्षापासून जास्त शिवसेनेचे खासदार आहेत. लोकसभेला विधानसभेला लोकं मतदान करतात. नगरचे आमदार कशाप्रकारे जिंकतात त्यांच्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात. अचानक ते कसे हिंदुत्ववादी होतात? या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित असतात. जो पर्यंत काही भागात लोकं निर्भय होऊन मतदान करत नाही तोपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतात. पण आता या भागातला मूळ पक्ष जो आहे तो शिवसेनाच आहे. लोकांमध्ये रुजलेला पक्ष शिवसेना आहे. एखाद दुसरी निवडणूक हरली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली तो पक्ष नष्ट झाला असं होत नाही. विशेषत: शिवसेनेच्या बाबतीत तरी नाहीच नाही. या महाराष्ट्रातला सर्वात जुना पक्ष शिवसेना आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”अडीच वर्ष आता कोणत्याही निवडणूका नाहीत. हा सर्व काळ आम्ही सगळे पक्ष बांधणीसाठी झोकून देणार आहोत. काल मी इथे आलो, लोकांना भेटलो. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलो आहे. या जिल्ह्यात कोण ओरिजनल आहे? सगळे मूळचे काँग्रेसवाले. आता आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपात गेले. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे हिंदुहृदयसम्राटांच्या पायाशी बसायचे. यांना काही पक्ष वगैरे नसतो. जिथे सत्तेची हवा आहे तिथे हे जात असतात. आज फडणवीस मोदी आहेत तर ते तिथे आहेत. उद्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे सत्तेत आले तर हे सगळे लोकं आमच्या घराबाहेर रांग लावून उभे असतील”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हाच कायम मोठा भाऊ होता. शिवसेनेचे हे मोठेपण मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी शिवसेना तोडली. शिंदे गट हा अमित शहांचा गट आहे. त्यामुळे आता त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर जावं लागायचं. त्यावेळी त्यांना लाज वाटायची. आता ते दिल्लीत अमित शहांच्या बंगल्यातील हिरवळीवर पांढऱ्या पँटी घालून बसतात व उठताना त्यांच्या ढुंगणाला गवत लागलेलं असतं”, असा टोला त्यांनी लगावला.

Comments are closed.