महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार
Hingoli Parbhani Vidhan Parishad Election 2026 : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये (Parbhani Hingoli MLC Election 2026) शिवसेना महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सईद खान आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांच्यासह एकूण सात जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस असून पहिलाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. शिवसेना (Shivsena) महायुतीचे उमेदवार सईद खान यांचे बंधू मेहराज खान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मेहराज खान यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, जो अर्ज आज त्यांनी परत घेतला आहे. (Vidhan Parishad Election 2026)
Hingoli Parbhani Vidhan Parishad : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही प्रतिस्पर्ध्यांना बंडखोरांमुळे डोकेदुखीचा सामना करावा लागतोय. महाविकास आघाडीतील उबाठा सेनेचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यासमोर त्यांच्याच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे विजय जामकर आणि संग्राम जामकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे त्यांची ही डोकेदुखी वाढली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस आहे कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Uday Samant : बंडखोरी शमावण्यासाठी उदय सामंत परभणीत येणार
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी कायम आहे. मात्र ही बंडखोरी मोडण्यासाठी आता प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. महायुती मधील शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे विजय जामकर आणि संग्राम जामकर तसेच, भाजप नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हीच बंडखोरी शमावण्यासाठी उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत परभणीत येणार आहेत. उद्या त्यांच्या उपस्थितीमध्ये परभणीत महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे बंड क्षमते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उबाठा सेनेचे उमेदवार विवेक नावंदर हेही काँग्रेसचे बंडखोर सुशील देशमुख यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती करणार होते. तसेच त्यांनी शिवसेनेकडे ही त्यांनी याबाबत कळवले असून शिवसेनेच्या नेतृत्वाकडूनही काँग्रेस नेतृत्वाला तसंपर्क केला जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.