मुंबई इंडियन्सने पूर्ण पगार दिला नाही, परदेशी खेळाडूचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मुंबई इंडियन्स: आयपीएल 2026 चा हंगाम संपला आहे. अंतिम सामना गेल्या रविवारी (31 मे) खेळवला गेला. यामध्ये बुगंळुरुने  गुजरातचा परभाव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा चषक पटकावला. दरम्यान, हा हंगाम संपल्यानंतर तीन दिवसांनी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यात एका परदेशी खेळाडूने मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप केला आहे. या हंगामासाठी पूर्ण पगार न दिल्याचा आरोप खेळाडूने केला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर आहे.

दुखापतीमुळे सँटनर मुंबईसाठी संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही

दुखापतीमुळे सँटनर मुंबईसाठी संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. सँटनरने सांगितले की, मुंबई इंडियन्सने त्याला फक्त अर्धा पगार दिला आहे. मुंबईने सँटनरला 2 कोटी रुपयांना कायम ठेवले होते. न्यूझीलंडच्या कसोटी संघात सामील होण्यासाठी दुखापतीचे नाटक केल्याचा आरोपही सँटनरवर होता. यावर आता अष्टपैलू खेळाडू सँटनने या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळं घेतली होती माघार

सँटनरने सांगितले की. त्याने स्पष्ट केले की, त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे तो मुंबईचा पहिला सामना खेळू शकला नाही. त्यानंतर तो दिल्लीविरुद्ध फ्रँचायझीकडून खेळला आणि त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. पुनरागमन केल्यावर, सँटनरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो त्या हंगामात फक्त चारच सामने खेळू शकला.

पगाराच्या निम्मे पैसे मिळाले

सँटनरच्या दोन्ही खांद्यांना दुखापत झाली होती. त्याला वाटले की तो संघासाठी आपला जीव धोक्यात घालत आहे, पण हे मान्य केले गेले नाही. आपल्या पगारावर दावा करताना सँटनरने सांगितले की, मुंबई इंडियन्सने त्याला त्याच्या 2 कोटी रुपयांच्या पगारापैकी निम्मेच पैसे दिले, जे त्याला अजिबात आवडले नाही.

दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत आयपीएलचे नियम काय आहेत?

आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू हंगामाच्या मध्यात जखमी झाला, तर त्याला त्याच्या कराराची संपूर्ण रक्कम दिली जाते. तथापि, काहीवेळा खेळाडूंना त्यांचा पगार हप्त्यांमध्ये मिळतो. सध्या, सँटनरच्या वक्तव्याबाबत मुंबईकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

आयपीएल 2026 च्या फायनल सामन्यामध्ये आरसीबीने गुजरातला केलं पराभूत

आयपीएल 2026 च्या फायनल सामन्यामध्ये आरसीबीने गुजरातला घरच्या मैदानावर पराभूत केले. गुजरात टायटन्स संघाचा पाच विकेटने पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरला आहे. या सामन्यामध्ये विराट कोहलीने आपल्या आयपीएल करियरमधील वेगवान अर्धशतक करत महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 155-8 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आसीबीने 18 व्या ओव्हरमध्ये हा सामना खिशात घातला. १८ नंबरची जर्सी घालणाऱ्या विराटने 18 व्या ओव्हरमध्येच षटकार मारत विजय मिळवला. विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली. आयपीएलच्या इतिहासामध्ये रजत पाटील सलग आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्माच्या नावावर हा रेकॉर्ड आहे.

आणखी वाचा

Comments are closed.