स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं
रत्नागिरी बातम्या : चिपळूण मधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर कांचन मदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. 4500 रुपयांची लाच घेताना डॉक्टर कांचन मदार यांना रंगेहात पकडल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.
तक्रारीनंतर जवळपास सहा तासात अँटी करप्शन ब्युरो च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत कारवाई
सुशिक्षित महिलेच्या तक्रारीनंतर जवळपास सहा तासात अँटी करप्शन ब्युरो च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत कारवाई केली . डॉक्टर कांचन मदार हे वैद्यकीय क्षेत्रातील रत्नागिरी जिल्ह्यातलं मोठं नाव आहे. शुल्लक रकमेची लाच घेताना अटक झाल्याच्या वृत्तानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं
धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा शासकीय गोदाम व्यवस्थापकाला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) रंगेहात पकडले आहे. मनिष महेश बागुल (वय 30) असं अटक करण्यात आलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचं नाव आहे.
ऑनलाइन बिल प्रक्रिया पुढे सरकवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी
ऑनलाइन बिल प्रक्रिया पुढे सरकवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे धुळे महसूल विभागात आणि शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी मनिष बागुल याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार शेतकरी हे धुळे तालुक्यातील अंचाडे गावचे रहिवासी आहेत. तक्रारदार शेतकरी आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या शेतात पिकवलेली ज्वारी महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत (MSP) विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. शासनाच्या नियमानुसार, नोंदणी झाल्यानंतर ते आपली ज्वारी विक्रीसाठी धुळे येथील शासकीय गोदामात घेऊन आले होते.
शासकीय कामासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने सतर्क शेतकऱ्याने त्याच दिवशी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने तात्काळ प्रकरणाची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी मनिष बागुल याने पंचांसमक्ष 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचं आणि ती स्वीकारण्यास होकार दिल्याचं निष्पन्न झालं. लाचेची मागणी सिद्ध होताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोदामातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेतकरी पैसे देण्यासाठी गेला असता, मनिष बागुल याने 5 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतःच्या हाताने स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात अटक केली.
आणखी वाचा
Comments are closed.