मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च 30 टक्क्यांनी फुगला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-66) प्रकल्पाचा मूळ खर्च वाढला आहे. विलंब आणि डिझाईन बदलामुळे मुळच्या 3,500 कोटी रुपये खर्चावरून तो 7,300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. काही अहवालावरून तो 19 हजार कोटी रुपयांहून जास्त आहे. डांबरी रस्त्यांऐवजी काँक्रिटचे रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि बायपासची संख्या वाढल्याने खर्च 30 टक्क्यांनी फुगल्याचे आकडे पुढे येत आहेत.
पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी कडक भूमिका घेत रखडलेल्या टप्प्यांना यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विशेषतः आरवली-कांटे आणि कांटे-वाकेड हे अतिशय महत्त्वाचे टप्पे मार्च 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे कडक आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ही डेडलाईन पुढे सरकून 31 मे 2026 झाली. मात्र आज जून उजाडला तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
रत्नागिरी जिह्यातील खेड परिसरासह संपूर्ण कोकण पट्टय़ात महामार्गाचे काम कमालीची संथ गतीने सुरू आहे. सध्या महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचे काम अर्धवट अवस्थेत लटकले आहे.
Comments are closed.