प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्

राधानगरी : प्रेमाचे आमिष दाखवून, फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन महाविद्यालयीन १९ वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे (Kolhapur Crime news) झाले आहेत. या प्रकरणाचा तपास मुरगूड पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणातील राधानगरी तालुक्यातील चारही आरोपींना न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, या प्रकरणी तपास यंत्रणा विविध ठिकाणी जाऊन पुरावे गोळा (Kolhapur Crime news) करण्यात व्यस्त आहे. अटकेत असणाऱ्या आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकूर, ता. राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) या आरोपींकडून तपासात गुन्ह्यांची कबुली मिळाल्याची माहिती समोर आली आहे.(Kolhapur Crime news)

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात आरोपींनी तिला धमकावून अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या विविध ठिकाणांची पोलिसांनी पाहणी केली आहे. मुरगूड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर येथील लॉज तसेच इतर संबंधित स्थळांवरील माहिती संकलित केली जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाइल जप्त केले असून, त्यातील महत्त्वाचा डेटा तपासला जात आहे.

Kolhapur Crime news: पुरावे आणि तांत्रिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू

मुरगूडच्या सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी या प्रकरी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तीन आरोपींकडून पीडितेवर प्रत्येकी एकदा अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र चौथा आरोपी विक्रम पाटील याच्याकडून वारंवार अत्याचार झाल्याचं तपासात पुढे आलं आहे. याबाबत अधिक पुरावे आणि तांत्रिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. माहितीनुसार, मोबाइलमधून काही फोटो व व्हिडीओ तसेच महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काही माहिती किंवा व्हिडीओ डिलीट केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुरगूड पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनेतील जे संशयित आरोपी आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची माहिती आहे.

Kolhapur Crime news: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व व्हिडीओ…

ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने या महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार तरुणांनी दहा महिन्यांत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्याशी ओळख झाली होती. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले व नंतर मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये तिला नेले. तेथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आदित्य शेटकेने या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकूर) याच्यासोबत करून दिली. रणजितने फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून त्या तरुणीला गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी वारंवार दिली. यानंतर रणजित मुधोळकर याने या तरुणीची ओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्यानेच त्या तरुणीला प्रणवगिरीशी बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने भीती दाखवत त्या तरुणीला स्वतःच्या कारमधून घेऊन एका लॉजमध्ये अत्याचार केला. रणजित मुधोळकर याने या तरुणीची विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे) याच्याशीही जबरदस्तीने ओळख करून दिली. ओळखीनंतर विक्रम पाटील याने या तरुणीला, “तुझे आधीचे सर्व फोटो व व्हिडीओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो,” असे सांगून पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.