कार, फ्लॅट अन् सोन्याच्या अंगठीसाठी सुनेचा छळ, पुण्यात 25 वर्षीय नवविवाहितेनं संपवलं जीवन
पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय विवाहितीने आपल्या राहत्या घरात गळफास (Pune Crime News) घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. पतीसह सासरच्यांकडून सातत्याने होणारी पैशांची मागणी, शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने तिचं आयुष्य (Pune Crime News) संपवलं आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे असं जीवन संपवणाऱ्या २५ वर्षीय नवविवाहितेचं नाव आहे.(Pune Crime News)
तिने लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर तेजस्विनीचे नातेवाईक आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पीडितेच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.(Pune Crime News)
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनी हिचे लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिच्याकडे वारंवार पैशांची आणि वस्तुंची मागणी केली जात होती. “चारचाकी गाडी आणि फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आण,” असं म्हणत सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला होता. इतकेच नाही तर, माहेरहून सोन्याची अंगठी आणण्यासाठीही तिच्यावर सतत मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जात होता.(Pune Crime News)
सासरच्या लोकांकडून होणारा सततचा छळ आणि पैशांची हाव यामुळे तेजस्विनी प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. या दुर्दैवी घटनेनंतर पीडित तेजस्विनीच्या वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Beed Crime News: गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीडच्या गेवराई शहरातील 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी पती, सासू-सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी आणि पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.पूजा प्रमोद सुरवसे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पूजाने गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला होता. त्यानंतर सायंकाळी तिच्या वडिलांना फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालय गाठले असता तेथे पूजाचा मृतदेह आढळून आला.
मृत महिलेच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पूजाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूळची परभणी येथील रहिवासी असलेल्या पूजाचे वर्षभरापूर्वीच प्रमोद सुरवसे याच्याशी लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही आनंदाने सुरू होते. परंतु सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचं पूजाने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.