साताऱ्याच्या सुशांतची जपानमध्ये उत्तुंग झेप; निहोन विद्यापीठात संशोधन सहायकपदी निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साताऱ्यातील युवा संशोधक सुशांत सुभाष वाघमारे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘निहोन विद्यापीठा’त संशोधन सहायक म्हणून निवड झाली असून, जपान सरकारकडून त्यांना ‘इंजिनीअर, स्पेशालिस्ट इन ह्युमॅनिटीज अॅण्ड इंटरनॅशनल सर्व्हिसेस’ या प्रकारातील निवासी परवानाही मंजूर करण्यात आला आहे.

वाघमारे यांचे प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर, मंचर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण मालोजीराजे माध्यमिक विद्यालय लोणंद येथे पूर्ण झाले. इयत्ता अकरावीपासून एम. एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्रपर्यंतचे शिक्षण त्यांनी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात घेतले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादासाठी महत्त्वाची मानली जाणारी जपानी भाषेची ‘जेएलपीटी एन-२’ ही प्रगत परीक्षा त्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. इंटरनॅशनल स्कूल टोकियो येथे शिक्षण घेत त्यांनी जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवले. वाघमारे यांचे कुटुंबही शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे.

१ जूनपासून सुशांत यांनी निहोन विद्यापीठात अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला असून, त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.