अद्भूत ! कर्नाटकातील या मंदिरांच्या खांबातून ऐकायला येतात 7 सूर
भारतातील अनेक मंदिरे स्थापत्यशैली आणि चमत्कारामुळे प्रसिद्ध आहेत. असच एक अनोखं आणि प्राचीन मंदिर म्हणजे कर्नाटकातील हंपी येथील विठ्ठल मंदिर. या मंदिराची विशेषता म्हणजे येथील संगीत खांब, ज्यातून आजही सा रे ग म प ध नि सा हे 7 सूर ऐकायला येतात. आज आपण या मंदिराच्या या सूरांच्या रहस्याबद्दल जाणून घेऊयात,
7 सूर
कर्नाटकातील या विठ्ठल मंदिरातील मुख्य मंडपामध्ये 56 खांब आहेत. हे खांब दगडी असून त्यातून संगीताचे सूर ऐकायला येतात. तुम्ही जेव्हा यांना हळूवारपणे स्पर्श करता तेव्हा यातून एक ध्वनी (उदा. मृदंग, टाळ, बासरी) बाहेर पडतो. हे स्तंभ ग्रॅनाईटच्या एकाच अखंड तुकड्यात कोरलेलं आहे. मुख्य स्तंभाच्या भोवती सात लहान स्तंभ आहेत, ज्यातील प्रत्येक स्तंभातून वाद्याचा आवाज ऐकायला येतो.
हेही वाचा – शिव मंदिर : भुतांनी बांधलेले शिवमंदिर
ऐतिहासिक मंदिर
हे मंदिर 15 व्या शतकात बांधले गेले असून युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या विठ्ठल अवताराला समर्पित आहे. मंदिराच्या अंगणात असलेल्या दगडी रथाचे शिल्प आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
15 व्या शतकातील बांधकाम
विजयनगर साम्राज्याचे राजा देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दीत 15 व्या शतकात या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं. पुढे राजा कुष्णदेवराय यांनी या मंदिराचा विस्तार केल्याची माहिती आढळते.
महत्ताची टीप –
आता हा अद्भूत वारसा जपण्यासाठी खांबांना स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘या पर्वता’वर आहे हनुमानाचे वास्तव्य
Comments are closed.