सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास

सोलापूर विधान परिषद निवडणूक सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक (सोलापूर विधान परिषद निवडणूक) रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा समान रंगणार आहे. जिल्ह्यात आमचे दोन खासदार आणि पाच आमदार आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीची मोठी ताकद असल्याने आम्ही मतदारांकडे जाऊन मते मागू असे वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी केले. पालकमंत्री ही मोठी माणसं आहेत, आम्ही लहान आहोत पण कासव गतीने आम्ही निवडणूक जिंकू अशी टोलीबाजी वसंतराव देशमुख यांनी केली आहे.

पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर जाऊन स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचं घेतलं दर्शन

आज देशमुख यांनी भाजपला गुगली टाकत पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर जाऊन स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. सोलापूर विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी डावलून भाजपने राऊत यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे परिचारक समर्थक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य भाजपवर तीव्र नाराज आहेत. यातूनच आज महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे दर्शन घेतल्याने भाजपची चिंता वाढू लागली आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि स्वर्गीय सुधाकर परिचारक हे आमचे नेते असून परिचारांनी आम्हाला लढायला शिकवले आणि त्यातूनच आम्ही घडलो असे सांगत परिचारक आमचे कायम दैवत असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

सोलापूर विधान परिषदेत पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील सामना रंगणार

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वसंतराव देशमुख यांची उमेदवारी कायम ठेवून सोलापूरची जागा बिनविरोध होऊ दिली नाही. यातूनच आता सोलापूर विधान परिषदेत पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी पंचायत राज निवडणुकीत मोठे यश मिळविल्याने भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी आहे. मात्र आता महाविकास आघाडीकडून भाजपच्या नाराज नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कडून सुरू झाल्याने पालकमंत्री आणि पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेतील (Vidhan Parishad Election 2026) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान पार पडणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे (Vidhan Parishad Election 2026) राज्याचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.