गोरेगाव पूर्वचे पहिले शाखाप्रमुख चंद्रकांत सामंत यांचे निधन
गोरेगाव पूर्वचे पहिले शाखाप्रमुख चंद्रकांत सामंत ऊर्फ भाई सामंत यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेत सुरुवातीच्या काळापासून सक्रिय असलेल्या चंद्रकांत सामंत यांनी तब्बल २० वर्षे शाखाप्रमुखपद भूषविले होते. त्यांनी शिवसेनेकडून दोन वेळा मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. निरलॉन भारतीय कामगार सेनेचे ते चिटणीस होते. निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. चंद्रकांत सामंत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी मालाड पूर्व येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, ज्येष्ठ शिवसैनिक मकरंद म्हात्रे, लहू भोसले, शाम नायडू यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.