सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला : सुधीर मुनगंटीवार
झुरळ जनता पक्षावर सुधीर मुनगंटीवार : सुप्रीम कोर्टच्या माननीय न्यायमूर्तींना असं वाटलं की ते जे बोलताय ती छोटी गोष्ट आहे. मात्र ती छोटी गोष्ट नव्हती. तुम्ही जेव्हा देशातील तरुणांना अशी उपमा देता, तेव्हा तरुणांच्या मनात असा भाव हा जन्माला येतो आणि अशा भावातून तरुणांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. पण अशा प्रकारच्या प्रयोगाला एक योग्य दिशा आणि व्यवस्था लागते आणि अशा प्रकारची दिशा आणि व्यवस्था नसेल तर असा प्रयोग पर्याय ठरत नाही. भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानातून ही व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे सीजेपी काही पर्याय ठरू शकत नाही. मात्र हे खर आहे की सीजेपीच्या (Cockroach Janta Part) या प्रयोगातून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे की, सामान्य माणसाचं मन दुखेल अशा शब्दांचा प्रयोग करायला नको, सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही. त्यातून हा प्रयोग जन्माला आला, त्यामुळे असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. असे करू नका भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बोलतानाही व्यक्त केलं आहे. ते चंद्रपुरात बोलत होते.
Sudhir Mungantiwar: असे विकाऊ कार्यकर्ते घेऊन पक्ष चालवला जात असेल तर त्याला कोण जबाबदार?
विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांना 5-5 लाख रुपये वाटण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, आज 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवली होती. त्यांनी पैसे घेतले असेल तर तुम्ही त्यांना निष्ठा शिकवा ना, असे विकाऊ कार्यकर्ते घेऊन पक्ष चालवला जात असेल तर त्याला कोण जबाबदार आहे? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तसेच, मला अभिमान आहे की आमच्या कार्यकर्त्यांना कोणी मोहात पाडू शकत नाही. आम्हाला दुसरा पक्ष काय करतो याच्याशी काही लेणं देणं नाही. 1952, 1975 मध्ये जे आरोप झाले तेच 2026 मध्ये होत आहेत. त्यामुळे लोकांची मानसिकता कशी बदलवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सर्वच पक्षांनी त्यांचे कार्यकर्ते अशा गोष्टींपासून दूर राहावे म्हणून राष्ट्रभक्तीचं व्हॅक्सिन दिलं पाहिजे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.