Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यातील खासगी जंगलात 18 वर्षांच्या संवर्धनानंतर रॉयल बंगाल वाघाचे दर्शन

संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या वन क्षेत्रात गेली अनेक वर्षे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे काम सुरू आहे. यासाठी बफरझोन, वनभागात छुपे कॅमेरे लावणे अशा कामांमुळे वाघाचे अस्तित्व वाढत आहे. अशातच कोयना अभयारण्यात पट्टेरी वाघ सोडण्यात आल्यामुळे वाघाची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. वाघाच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू असताना या प्रयत्नांना यश येत असून, तब्बल 18 वर्षांच्या सातत्यपूर्ण संवर्धन आणि जंगल पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांतून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये एका खासगी मालकीच्या जंगलात रॉयल बंगाल वाघाचे दर्शन घडले आहे. जंगलात बसविण्यात आलेल्या गुप्त कॅमेरा ट्रॅपमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद झाला.

एकेकाळी वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेल्या या जंगलाचे जतन करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करण्यात आले. स्थानिक संवर्धकांनी जंगलाचे नैसर्गिक स्वरूप पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि वन्यजीवांसाठी पोषक अधिवास तयार करण्यासाठी सातत्याने काम केले. या प्रयत्नांचे फळ म्हणून आता या परिसरात रॉयल बंगाल वाघाची उपस्थिती नोंदवली गेली आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघाचे दर्शन हे त्या जंगलातील परिसंस्थेच्या सुदृढतेचे आणि जैवविविधतेच्या पुनर्स्थापनेचे महत्त्वपूर्ण लक्षण मानले जाते. अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी असलेल्या वाघाची उपस्थिती म्हणजे त्या भागात पुरेसे भक्ष्य, सुरक्षित अधिवास आणि पर्यावरणीय समतोल निर्माण झाल्याचे संकेत आहेत.

कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद झालेल्या या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी आणि संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरीसारख्या कोकणातील परिसरात खासगी जंगलांच्या संवर्धनातूनही मोठे पर्यावरणीय यश मिळू शकते, याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.

वाघ नेमका रत्नागिरी जिल्ह्यातील एईआरएफ (Applied Environmental Research Foundation) च्या संवर्धन करारांतर्गत जतन करण्यात आलेल्या खासगी जंगलात आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र सुरक्षेच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या कारणास्तव गाव किंवा अचूक स्थान जाहीर करण्यात आलेले नाही. हे जंगल उत्तर सह्याद्री परिसरातील रत्नागिरीतील खासगी वनक्षेत्र असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हा रॉयल बंगाल वाघ रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी मालकीच्या आणि संवर्धन करारांतर्गत संरक्षित वनक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळला. वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित जंगलाचे अचूक स्थान जाहीर करण्यात आलेले नसले तरी हे वनक्षेत्र उत्तर सह्याद्रीतील रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेली 18 वर्षे या परिसरात खासगी जंगलांचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि वृक्षतोड रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

विशेष म्हणजे, संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये-फणसवळे गाव परिसरातील खासगी वनक्षेत्रात हा रॉयल बंगाल वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला आहे. गेल्या 18 वर्षांपासून या वनक्षेत्रात जंगल संवर्धन, वृक्षतोड प्रतिबंध आणि नैसर्गिक अधिवास पुनर्स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांमुळेच सर्वोच्च शिकारी असलेल्या वाघाचे अस्तित्व पुन्हा नोंदवले गेल्याने संवर्धन क्षेत्रासाठी ही मोठी आणि आशादायी घटना मानली जात आहे. संगमेश्वर तालुक्याच्या वनविभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील सृष्टी ज्ञान संस्थेचे प्रतिक मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून अशा प्रकारचा वाघ आढळून आल्याने आता वन संवर्धनाची जबाबदारी अधिक वाढल्याचे नमूद केले आहे. सह्याद्रीचा वन पट्टा असो अथवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यामध्ये असणाऱ्या वनराईचे आता जतन होणं महत्वाचे आहे. असं झालं तरंच येथील वाघाची संख्या वाढण्यास मदत होईल. – प्रतीक मोरे, सृष्टी ज्ञान संस्था, संगमेश्वर – देवरुख

Comments are closed.