दिल्ली आगीच्या घटनेप्रकरणी कुकलाही अटक करण्यात आली आहे.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लोरीश स्टे हॉटेलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी हॉटेलचा स्वयंपाकी केशव नेगी याला अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात स्वयंपाक्याचा निष्काळजीपणा हे आगीचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. पोलिसांनी हॉटेलच्या इतर अनेक कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी मुख्य आरोपी आणि हॉटेलचा मालक लवकेश बजाज याला दोन दिवसांपूर्वीच अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 3 जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फ्लोरीश स्टे हॉटेलमध्ये आग लागून 21 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 11 परदेशी नागरिक आणि 10 भारतीय नागरिकांचा समावेश होता. त्यापैकी नऊ जण आफ्रिकन देशांचे नागरिक होते.
Comments are closed.