तृणमूल आमदाराच्या वाहनावर हल्ला

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये कोलकातातील कामरहाटी येथे शनिवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी हल्ला केला. आमदार दौऱ्यावर असताना आरियादाहा परिसरात ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांनी ‘चोर, चोर’ अशा घोषणा देत आमदारांच्या गाडीवर अंडी फेकली आणि लाचेचे पैसे परत करण्याची मागणी केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार मित्रा एका सभेतून बाहेर पडताना पाहून लोक त्यांच्या गाडीकडे धावले. काहींनी गाडीचा 100 मीटरपर्यंत पाठलाग केला. एक व्यक्ती रस्त्यावर पडलेली वीट उचलून गाडीवर फेकताना दिसली. तथापि, टीएमसी नेत्याने हल्ल्यावेळी आपण गाडीत नव्हतो असा दावा करत ड्रायव्हरवर हल्ला झाल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.