कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी OPEC+.
रशिया समवेत 22 देशांनी घेतला मोठा निर्णय : किमतीवर त्वरित प्रभाव पडण्याची शक्यता कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हिएन्ना येथे रविवारी पार पडलेल्या बैठकीत ओपेक प्लसच्या मंत्र्यांनी जुलैसाठी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन 1,88,000 बॅरल करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर त्वरित कुठला प्रभाव पडण्याची शक्यता नाही. मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्चे तेल मोठ्या प्रमाणात महागले आहे.
ओपेक प्लसच्या या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमती त्वरित कमी होणार नसल्याने भारताला महाग इंधनापासून दिलासा मिळणार नाही. होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग जोपर्यंत बंद आहे, तोपर्यंत या उत्पादनवाढीचा कुठलाच खास अर्थ नसल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. कच्च्या तेलाचे प्रतिदिन उत्पादन 1,88,000 बॅरलपर्यंत नेण्याच्या निर्णयामुळे प्रत्यक्ष पुरवठा वाढणार नसून हा एक धोरणात्मक संकेत अधिक असल्याचे मानले जात आहे.
ओपेक प्लसच्या प्रमुख देशांच्या तेल मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यावर सहमती झाली. ओपेक प्लसच्या सदस्य देशांमध्ये सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवैत, कजाकिस्तान, अल्जीरिया आणि ओमान सामील आहेत. या समुहात एकूण 22 देश सदस्य आहेत. तर कच्च्या तेलाच्या उत्पादन वाढीचा निर्णय मागील महिन्यांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांसारखाच आहे.
व्यवस्था संपुष्टात आणण्याची योजना
कच्च्या तेलाच्या उत्पादन वाढीचा उद्देश बाजारात स्थिरता कायम राखणे होता. परंतु 7 देशांनी कच्च्या तेलाच्या ऐतिहासिक स्वरुपात अधिक किमतींच्या काळात स्वत:च्या भरपाईच्या प्रक्रियेला तीव्र करण्याची संधी म्हणून याकडे पाहिले. खबरदारी बाळगणे आणि उत्पादन संतुलनाला हळूहळू संपुष्टात आणण्याची प्रक्रिया पुढे नेणे, रोखणे किंवा उलटण्यासाठी पूर्ण लवचिकता राखण्याच्या महत्त्वाचा ओपेक प्लसने पुनरुच्चार केला आहे. यात नोव्हेंबर 2023 मध्ये घोषित पूर्वीपासून लागू स्वैच्छिक समायोजन किंवा वॉलेंट्री प्रॉडक्शन मागे घेणे सामील आहे.
अतिरिक्त उत्पादनाची चिंता
मध्यपूर्वेतील युद्धाचे चित्र बदलल्यास आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणची पकड स्sल झाल्यास काय घडणार यावरून ओपेक प्लस सतर्क होता. तर होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला झाल्यास बाजार अत्यंत वेगाने टंचाईच्या भीतीवरून सरप्लसच्या भीतीकडे जाऊ शकतो.
Comments are closed.