अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश, नेमकं
गुन्हे बातम्या ठेवा: अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका 25 वर्षीय तोतया ‘लेडी सिंघम’ला पुणे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या (Lashkar Police Station) पथकाने कॅम्प परिसरात शनिवारी (6 जून) ही धडक कारवाई केली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25 वर्षे) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिनाचे पोलीस दलात भरती होऊन पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते, मात्र ते भंगले होते. सध्या ती एका खाजगी कंपनीत (Private Company) नोकरी करत होती.
Pune Crime News: नेमकी घटना काय?
शनिवारी 6 जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) महेश शिंदे हे आपल्या पथकासह कॅम्प परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना एका नामांकित खाजगी क्लिनिकच्या (Private Clinic) बाहेर एक महिला पोलिसाच्या वर्दीत उभी असलेली दिसली. तिच्या खांद्यावर पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे स्टार्स होते. मात्र, तिच्या हालचाली आणि वावर संशयास्पद वाटल्याने पीएसआय महेश शिंदे यांना संशय आला.
Pune Crime News: चौकशीत झाली बोलती बंद
संशय बळावल्याने पीएसआय शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची चौकशी केली. “तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात? तुमचे ओळखपत्र दाखवा,” असे पोलिसी भाषेत प्रश्न विचारताच संबंधित महिलेची बोलती बंद झाली. ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, ती तोतया पोलीस असल्याचे निष्पन्न झाले.
Pune Crime News: वर्दी घालण्यामागचे धक्कादायक कारण
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी समिना हिला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे तिला अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट (Receptionist) तसेच इतर लोकांवर आपण पोलीस अधिकारी असल्याचा दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी आरोपी समिना इनामदार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, तिने यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.