टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्समधूनही सूर्यकुमार यादव OUT? सगळ्यांत मोठा पुरावा समोर, दोन संघ

सूर्यकुमार यादव बातम्या: भारतीय टी-20 संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या कठीण काळातून जाताना दिसत आहे. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून टी-20 संघाचे नेतृत्वही काढून घेण्यात आले आहे. या दोन मोठ्या धक्क्यांनंतर आता आणखी एक मोठी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे, सूर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचे नाते संपुष्टात येणार का?

नेमकं काय घडतंय? (Suryakumar Yadav News)

सूर्यकुमार यादवने अलीकडेच मुंबई इंडियन्सला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याच्या प्रोफाइलवर मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील फोटोही दिसत नसल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामापूर्वी सूर्यकुमार आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमारची पत्नी देवीशा शेट्टी अजूनही मुंबई इंडियन्सला फॉलो करत असल्यामुळे या चर्चांमध्ये आणखी रंग भरला आहे. मात्र, फ्रँचायझीकडून किंवा सूर्यकुमारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यास पुढे काय? (Suryakumar Yadav Mumbai Indians)

आयपीएल 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला तब्बल 16.25 कोटी रुपयांत रिटेन केले होते. 2018 पासून तो मुंबईच्या मधल्या फळीचा कणा राहिला आहे. त्यामुळे जर त्याने फ्रँचायझी सोडण्याचा निर्णय घेतला, तर तो आयपीएलमधील सर्वात मोठ्या ट्रान्सफरपैकी एक ठरू शकतो. काही माध्यमांच्या अहवालांनुसार सूर्यकुमारची जुनी टीम कोलकाता नाईट रायडर्स त्याच्यासाठी सर्वात मोठी दावेदार मानली जात आहे. केकेआरला अनुभवी भारतीय फलंदाजासोबतच कर्णधाराचीही गरज आहे. त्यामुळे सूर्यकुमारची पुनरागमनाची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय चेन्नई सुपर किंग्स देखील त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे. अनुभवी खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सीएसकेला मधल्या फळीत विश्वासार्ह भारतीय फलंदाजाची गरज भासू शकते.

मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमारचा सुवर्ण प्रवास (Suryakumar Yadav Mumbai Indians IPL News)

सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून केली होती. मात्र त्या हंगामात त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो केकेआरमध्ये गेला आणि तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2018 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केल्यानंतर मात्र त्याच्या कारकिर्दीने वेगळीच उंची गाठली. मुंबईसाठी त्याने आतापर्यंत 127 सामने खेळत 4,020 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन शतके आणि अनेक संस्मरणीय खेळी साकारत संघाच्या यशात मोठे योगदान दिले. दुसरीकडे, केकेआरकडून खेळताना त्याने 60 सामन्यांत 684 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोलकात्याशी त्याचे जुने नातेही विशेष मानले जाते.

अद्याप अधिकृत घोषणा नाही

सध्या सोशल मीडियावरील हालचाली आणि विविध अहवालांच्या आधारे चर्चांना उधाण आले असले, तरी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र संघातून वगळणे, कर्णधारपद गमावणे आणि आता मुंबई इंडियन्सशी संबंधित सोशल मीडिया बदल यामुळे आगामी आयपीएलपूर्वी मोठा निर्णय होण्याची शक्यता क्रिकेट चाहत्यांना नक्कीच उत्सुकतेत ठेवणारी आहे.

हे ही वाचा –

भारत वि Afg कसोटी थेट दिवस-3 : फॉलोऑन का टाळला जाईल? अफगाणिस्तानसमोर मोठे आव्हान; भारताच्या नजरा भक्कम आघाडीवर आहेत

Comments are closed.