1 कोटी 23 लाख लुटणाऱ्यास दिल्लीतून अटक
बंगळूर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तुमच्या माटुंगा येथील कॅनरा बँकेच्या खात्यात 3 कोटी रूपयांची भ्रष्टाचार झाला असून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले असल्याचे सांगून 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला दिल्लीतून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक बाजूने तपास करत आरोपी गगनदीप भारद्वाज (रा.नोएडा) याला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. कोणीही तुमचे बँक अकाउंट किंवा सिमकार्डचा गैरवापर झाला असून त्याकरीता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल तर घाबरुन जाऊ नका. तत्काळ नजिकच्या पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.
Comments are closed.