दूषित पाणी आणि डासांमुळे पावसाळ्यात होतात हे आजार
पावसाळ्यात हवामानातील बदलांमुळे आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे विविध आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. मात्र अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी त्याचे लवकर निदान करून उपचार केल्यास हे आजार दूर ठेवता येतात. आज आपण या ऋतूत कोणत्या आजारांचा धोका जास्त असतो आणि त्यापासून दूर राहण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊयात.
पाण्यामार्फत होणारे आजार
कावीळ – दूषित पाण्यामुळे यकृताला सूज येते.
गॅस्ट्रो आणि डायरिया – जुलाब आणि उलट्या होणे.
टायफॉइड – दूषित अन्न आणि पाण्यामुळे येणारा तीव्र ताप.
हेही वाचा – वाढत्या Breast Cancerला जीवनशैली जबाबदार? या सवयी वेळीच बदला, नाहीतर…
डासांमुळे होणारे आजार
डेंग्यू – साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या डासांमुळे हा ताप येतो. डेंग्यू झाल्यास प्लेटलेट्स कमी होतात.
मलेरिया – अस्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या डासांमुळे हा आजार पसरतो.
हवेमार्फत होणारे आजार
व्हायरल फिव्हर – ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला, ताप येणे अशा समस्या जाणवतात.
डोळे येणे – पावसाळ्यात डोळे येण्याची समस्या प्रामुख्याने जाणवते.
आजारांपासून बचाव कसा कराल?
पाणी उकळून प्यावे –
पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून आणि गाळूनच प्यावे.
ताजे अन्न खावे –
रस्त्यावरील उघडे पदार्थ खाणे टाळून घरी तयार केलेले ताजे अन्न खावे.
डासांपासून संरक्षण –
घरात आणि परिसरात पाणी साचू देऊ नये. यासाठी तुम्ही मच्छरदाणीचा वापर करावा.
स्वच्छता राखा –
बाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा.
तज्ज्ञांचा सल्ला –
पावसाळ्यात कोणताही ताप किंवा लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाण्यापूर्वी या गोष्टी जरूर जाणून घ्या
Comments are closed.