Ratnagiri News – रत्नागिरीत मुसळधार पाऊस; उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरीत दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने प्रत्येकजण पावसाची वाट पहात होता. अखेर सायंकाळी ढगांचा गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. कार्यालय सुटण्याच्या वेळी आलेल्या पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट उडवली. काहींनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.सर्वत्र मातीचा सुगंध पसरला आणि रस्ते जलमय झाले.

कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पाऊस मात्र हुलकावणी देत होता. रिपरिप पावसाने हजेरी लावली तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांना आनंद झाला. पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले असताना पावसाची प्रतीक्षा होती.पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी टंचाई संपुष्टात येईल.

Comments are closed.