मृणाल गोरे उड्डाणपुलावरील समस्यांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन




मृणाल गोरे उड्डाणपुलावरील समस्यांच्या निषेधार्थ किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगावमधील मृणाल गोरे विस्तारित उड्डाणपुलाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. मात्र लोकार्पणापासून हा उड्डाणपूल वादात सापडला असून राजकारण तापताना दिसत आहे. उड्डाणपुलावरील खडी आणि ओबडधोबड पृष्ठभागाबद्दल विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होताना दिसत आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या यांच्या नेतृत्वाखाली आज उड्डाणपुलावरील समस्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.



Comments are closed.