झोजिला बोगद्याचा अंतिम 'ब्रेकथ्रू' गाठला.

आता लडाख अन् श्रीनगर दरम्यान थेट संपर्कव्यवस्था : अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होण्यासमीप

न्यूज एजन्सी/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या ‘जोजिला बोगद्या’चा अंतिम ‘ब्रेकथ्रू’ मंगळवारी पूर्ण झाला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवर स्थित आणि सवांत लांब सिंगल-ट्यूब द्वि-दिशात्मक जोजिला बोगद्यात बहुप्रतीक्षित ब्dरोकथ्रू ब्लास्ट यशस्वी ठरला, ज्याचा देश दशकांपासून प्रतीक्षा करत होता.

या यशस्वी कामगिरीसोबत काश्मीर आणि लडाखदरम्यान ऑल-वेदर मार्ग निर्माण करण्याचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होण्याच्या समीप पोहोचले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उपराज्यपाल सिन्हा यांनी आनंद व्यक्त केला.

लडाखला सर्व ऋतूंमध्ये काश्मीर आणि उर्वरित देशासोबत जोडणाऱ्या सामरिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण जोजिला बोगद्यात नार्मितीत मंगळवारी एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी नेंदविली गेली. बोगद्यात आत अंतिम खडकाच्या आच्छादनाला ब्लास्टद्वारे यशस्वीपणे तोडण्यात आले, याला इंजिनियरिंगच्या भाषेत ‘ब्रेकथ्रू’ म्हटले जाते. या अंतिम यशस्वी विस्फोटासोबतच बोगद्याची दोन्ही टोकं आता पूर्णपणे परस्परांशी जुळली आहेत, यामुळे प्रकल्प निर्मिती कार्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.

जानेवारी-फेब्रुवारी 2028 पर्यंत हा बोगदा सामान्य जनतेसाठी खुला होण्याची अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. ब्रेकथ्रूनंतर 7-8 महिन्यांपर्यंत निर्मितीकार्य जारी राहणार आहे. त्यानंतर विद्युत अन् इतर तांत्रिक कार्य सुरू करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग तसेच अवसंरचना विकास निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जोजिला बोगद्याचे स्वरुप

11,578 फुटांच्या उंचीवर निर्मिती

13 किलोमीटर लांब आहे बोगदा

9.5 मीटर रुंद अन् 7.57 मीटर उंच भुयार

घोड्याच्या नाळेसारख्या आकाराचा बोगदा

प्रवासाचा कालावधी घटणार

बोगदा सुरू झाल्यावर जोजिला खिंडीतून जाण्यासाठी लागणारा दीड तासाचा वेळ आता कमी होत केवळ 15 मिनिटे राहणार आहे. तसेच हा बोगदा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर वर्षभर वाहतूक सुनिश्चित करणार आहे. काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील बालटाला लडाखच्या द्रास जिल्ह्यातील मिनिमार्गशी हा बोगदा जोडणार आहे. सध्या हा मार्ग प्रचंड हिमवृष्टीमुळे वर्षातील अनेक महिने बंद राहतो.

31 किलोमीटरचा पूर्ण प्रकल्प

प्रकल्पाची एकूण लांबी 31 किलोमीटर असून यातील 18 किलोमीटर लांब अप्रोच मार्ग अन् पूल सामील आहेत. मुख्य भुयार बालटालपासून मिनिमार्गपर्यत फैलावले असून हिमालयाच्या टणक खडकाळ संरचनांना भेदून ते निर्माण करण्यात आले आहे.

सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भुयारीमार्ग

हा बोगदा खुला झाल्याने सीमावर्ती क्षेत्रांमध्ये सैन्याची त्वरित तैनात आणि रसदपुरवठ्याला मजबुती मिळणार आहे. याचबरोबर पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. लडाखपर्यंत अडथळारहित वाहतूक होऊ शकणार आहे.

 

Comments are closed.