रंगभूमीवर होणार ‘शिक्कामोर्तब’; सागर कारंडे-भक्ती रत्नपारखीची नवी जोडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठी रंगभूमीवर आणखी एका वेगळ्या विषयावरील नाटकाची भर पडणार असून ‘शिक्कामोर्तब’ हे नवे नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. आयुष्यातील नाती, निर्णय आणि यश यांना समाजाच्या शिक्क्याची गरज असते का? या प्रश्नाला विनोदी आणि विचारप्रवर्तक अंगाने स्पर्श करणारे हे नाटक दोन जोडप्यांच्या आयुष्यातील घटनांवर आधारित आहे.

या नाटकात सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे आणि अनिषा सबनीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे सागर कारंडे आणि भक्ती रत्नपारखी यांची जोडी प्रथमच रंगभूमीवर एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकानंतर सागर पुन्हा एकदा रंगभूमीवर येतोय. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार 12 जून रोजी दुपारी 4 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात होणार आहे.

‘तरंगिणी एंटरटेन्मेंट’ आणि ‘नवनीत’ निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद शेलार यांनी केले आहे. अभिजीत पेंढारकर यांचे संगीत आणि वलय मुळगुंद यांची गीते लाभलेल्या या नाटकाविषयी नाटय़प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments are closed.