पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 21 सैनिकांचा मृत्यू
पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 हे हेलिकॉप्टर कोसळून 21 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पाकव्याप्त कश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सैनिकांना घेऊन नीलम व्हॅली सेक्टरकडे निघाले होते. उड्डाणाच्या वेळीच त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आणि हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमधील कोणीही वाचले नाही, अशी माहिती पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी दिली.
Comments are closed.