खाकी वर्दीतील देवदूत! अ‍ॅम्ब्युलन्स चालवत पोयनाड पोलिसांनी वाचवले दोन गंभीर जखमी तरुणांचे प्राण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पेझारी चेक पोस्ट येथे दुचाकी अपघातात ताडवागळे आदिवासी वाडीवरील दोनजण गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोयनाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतकेच नाहीतर रस्त्यावर तडफडत पडलेले पोलीस कर्मचारी समीर म्हात्रे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत जखमींना पेझारी येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचाराकरिता अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. खाकी वर्दीतील या देवदूतांमुळे दोन तरुणांचे प्राण वाचले आहेत.

बुधवारी दुपारी पेझारी चेक पोस्टजवळ दुचाकी व रिक्षामध्ये अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच चेक पोस्टवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात ताडवागळे आदिवासी वाडीवरील दिनेश नाईक व जान्या नाईक हे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी तत्काळ चेक पोस्ट येथे उभ्या असलेल्या मनस्वी मानव सेवा संस्थेच्या रुग्णवाहिकेच्या वाहनचालकासोबत संपर्क साधला. मात्र वाहनचालक तेथे उपस्थित नसल्यामुळे पोलीस कर्मचारी समीर म्हात्रे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिकेची चावी घेतली. यांनतर आपले पोलीस सहकारी कल्पेश नलावडे व सुरेश वाघमारे यांच्या साथीने जखमींना रुग्णालयात नेले.

Comments are closed.