बीडमध्ये भयंकर घटना, महाविद्यालयाच्या लिपिकाचं अपहरण; बेल्ट अन् काठीने पाठीची चामडी सोलेपर्यंत

बीड : बीडच्या परळीत एका लिपिकाला आर्थिक व्यवहारातून निर्जन स्थळी नेत तिघांकडून आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण (Beed Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले अनिल पत्की आणि आरोपी वैजनाथ यादव यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. या व्यवहारापोटी पत्की यांनी यादव यांना 1 लाख रुपये परत केले असे असतानाही यादव यांनी आणखी चार लाख रुपयांसाठी तगादा लावला.(Beed Crime News)

त्यानंतर यादव यांनी थेट लिपिकाचे घर गाठून त्यांना गाडीवर बसवत धारावती तांडा परिसरातील निर्जन स्थळी (Beed Crime News) एका झाडाखाली नेले. याच ठिकाणी त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांनी बेल्ट आणि लाकडाच्या (Beed Crime News) साह्याने बेदम मारहाण केली.यावरच ते थांबले नाहीत तर लिपिकाला पोलिसांकडे गेला तर जीवे मारण्याची धमकी ही दिली. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा दरम्यान केलेल्या मारहाणी नंतर लिपिकाला आरोपीच्या दुकानासमोर सोडून त्यांचा मोबाईल देखील घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(Beed Crime News)

लिपीक असलेले पत्की यांना केलेली ही मारहाण इतकी भीषण होती की त्यांच्या पाठीवर आणि शरीरावर सर्वत्र व्रण उमटले. या मारहाणीमुळे पत्की यांच्या मनात दहशत निर्माण झाली असून त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिलाय.या प्रकरणी अनिल पत्की यांच्या फिर्यादीवरून वैजनाथ यादव आणि त्याचे दोन अज्ञात साथीदारा विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.(Beed Crime News)

Beed Crime News: धमकी देऊन जवळपास आठ तास डांबलं

तर मिळालेल्या माहितीनुसार, “जर आरडाओरडा केला किंवा पोलिसांत तक्रार केली, तर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देऊन आरोपींनी तिला दुपारपर्यंत त्याच निर्जन स्थळी डांबून ठेवले. दुपारनंतर फिर्यादीला सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या अनिल पत्की यांनी नातेवाईकाना सांगितले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन सायंकाळच्या सुमारास परळी शहर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

आर्थिक व्यवहारातून निर्जन स्थळी नेत तिघांकडून आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या व्यवहारापोटी पत्की यांनी यादव यांना 1 लाख रुपये परत केले असे असतानाही यादव यांनी आणखी चार लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा दरम्यान केलेल्या मारहाणी नंतर लिपिकाला आरोपीच्या दुकानासमोर सोडून देण्यात आले. ही मारहाण इतकी अमानुष आहे की त्यांच्या पाठीवरची चामडी सोलून निघाली असुन शरीरावर सर्वत्र व्रण उमटले आहेत. अतिशय निर्दयीपणे ही मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.