Iran US War – इराणचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकेची F-35, F-15 आणि F-16 लढाऊ विमानं नष्ट केल्याचा दावा
आखातातील तणाव शिगेला पोहोचला असून अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणही पेटून उठला असून जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले करत आहे.इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) जॉर्डनमधील अमेरिकेच्या अल-अझराक हवाई तळाला लक्ष्य करत त्यावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. या भीषण हल्ल्यात अमेरिकेची अत्याधुनिक F-35, F-15 आणि F-16 फायटर जेट्स तसेच लष्करी कमांड सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणने केला आहे.
इराणच्या आयआरजीसीने जॉर्डनमधील अमेरिकेच्या मुख्य हवाई तळावर एकापाठोपाठ एक 12 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराणमधील करज, नजरबाद आणि पिशवा येथील औद्योगिक व लष्करी तळांवर जे हल्ले केले होते. त्याचा बदला घेण्यासाठीच थेट अमेरिकन लढाऊ विमानांना लक्ष्य करण्यात आल्याचे इराणने अधिकृत पत्रकात म्हटले आहे. ‘अल जझीरा’ने याबाबत वृत्त दिले आहे.
ताबडतोब इराक सोडा
इराणने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली आहेत. बगदादमधील अमेरिकन दूतावासाने इराकमध्ये राहणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना हाय अलर्टवर राहण्यास आणि कोणतीही वाट न पाहता तात्काळ इराक सोडण्यास सांगितले आहे. कोणत्याही क्षणी हवाई क्षेत्र बंद होऊ शकते किंवा विमानांची उड्डाणे रद्द होऊ शकतात, अशी चेतावणी देण्यात आली आहे. अमेरिकेने इराकसाठी ‘लेव्हल 4’ ही सर्वात कडक ट्रॅव्हल ॲडव्हायझरी लागू केली आहे.
कुवेतचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद
दरम्यान, इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या या युद्धाची धग आता शेजारील देशांनाही बसू लागली आहे. कुवेतने आपल्या सुरक्षेचा हवाला देत संपूर्ण हवाई क्षेत्र तात्काळ प्रभावाने बंद केले आहे. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकताच इराणचा थेट क्षेपणास्त्र हल्ला झाला होत. या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले असून आकाशात घिरट्या घालणारी अनेक व्यावसायिक विमाने आता इतर देशांतील सुरक्षित विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत.
US Iran Attacks कुवेतने आपली हवाई हद्द केली बंद, अमेरिकी तळांवर इराणच्या हल्ल्यांमुळे घेतला निर्णय
Comments are closed.