स्मार्टवॉच खरेदी करताना फक्त डिझाईन नाही, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा
सध्या बहुतेकजण स्मार्टवॉच वापरतात. स्मार्टवॉचचा आकार छोटा असला तरी फायदे मोठे आहेत. हे मनगटावरील छोटं गॅझेट आपल्याला कॉलिंगपासून हेल्थ फीचर्सपर्यंत अनेक वेगवेगळे फीचर्स ऑफर करतो. अनेकांच्या मते सर्व कंपन्या त्यांच्या स्मार्टवॉचमध्ये एकसारखे फीचर ऑफर करतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. अनेकजण स्मार्टवॉच खरेदी करताना त्याचे फीचर न पाहता केवळ डिझाइन पाहून त्याची खरेदी करतात आणि काहीच दिवसात आपण केलेल्या खरेदीचा त्यांना पश्चाताप होतो. त्यासाठी आज आपण स्मार्टवॉच खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षाच ठेवणं गरजेचं आहे हे पाहूयात…
कोणतंही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी ते तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनसोबत योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही हे तपासावं.
स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी उपलब्ध पर्यायांवर एक नजर टाका आणि तुमच्या बजेटनुसार आवश्यक फीचर्सवर लक्ष केंद्रित करा आणि खरेदीचा योग्य निर्णय घ्यावा.

हेही वाचा – कमी उंचीच्या व्यक्तींसाठी फॅशन टिप्स
स्मार्ट वॉच खरेदी करताना फक्त रंग आणि डिझाईन पाहू नये. सर्वात महत्त्वाचं पाहावं ते म्हणजे कंफर्ट. बेल्ट तुमच्या हाताला लागत नाही ना हे पाहावं.

ब्लूटूथ कॉलिंग आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले सुरू असताना बॅटरी किती वेळ टिकते, याचा अंदाज घ्या. साधारणपणे 5 ते 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणारी स्मार्टवॉच उत्तम मानली जाते.

तुम्ही बदलता येणारे (Removable Straps) बँड असलेली वॉच सुद्धा घेऊ शकता. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्ट्रॅप बदलू शकता.
हेही वाचा – फाटकी जीन्स फेकू नका, घरासाठी बनवा भन्नाट वस्तू
Comments are closed.