भाजपकडून कॉकरोच पार्टीचे फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा आरोप, अभिजीत दिपकेंनी एकाच वाक्यात प्रत्य

मुंबई : कॉकरोच जनता पार्टी(सीजेपी)च्या इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्स आणि एंगेजमेंट पॅटर्नबाबत संशय व्यक्त करत मुंबई पोलिसांकडे बुधवारी लेखी तक्रार देण्यात आली आहे. वकील अरविंद सिंह यांनी ही तक्रार केली असून, खात्याची तसेच त्यावरील फॉलोअर्सची सायबर तपासणी (Abhijeet Dipke CJP) करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, सीजेपीच्या इन्स्टाग्राम खात्यावरील हालचालींमध्ये काही संशयास्पद बाबी आढळल्या आहेत. स्वतंत्र सायबर तज्ज्ञाने सार्वजनिकरीत्या उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून तयार केलेल्या अहवालाचा हवाला देत, अल्प कालावधीत फॉलोअर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, सलग अनेक दिवस फॉलोअर्सची संख्या घटत गेल्यानंतर अचानक मोठी वाढ झाल्याचा पॅटर्न दिसून आल्याचे नमूद आहे. तसेच काही पोस्ट्सवरील लाईक्स आणि एकूण एंगेजमेंटमध्ये असमानता आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तर मुंबई पोलिसांकडून तक्रारीवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याबाबात पुण्यात अभिजीत दीपकेंनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे भाष्य केलं आहे.(Abhijeet Dipke CJP)

Abhijeet Dipke CJP: जेव्हा किरण रिजुजी यांनी ते ट्वीट टाकलं…

याबाबत बोलताना अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, मी याच्यावर उत्तर देतो हे संशय कुठून निर्माण झाला किरण रिजुजी जे आहेत आपले युनियन मिनिस्टर त्यांनी एक ट्वीट केलं की, कॉकरोच जनता पार्टीचे जे फॉलोवर्स आहेत, ते 40 का 50 टक्के पाकिस्तानी आहेत. ठीक आहे, आता तुमच्या सगळ्यांना सांगतो, कोणत्या पेजवर किती फॉलोवर्स असतात, हे त्या ऍडमिन शिवाय कोणीच पाहू नाही शकत त्याचा एक्सेस फक्त माझ्याकडे आणि जेव्हा किरण रिजुजी यांनी ते ट्वीट टाकलं, त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% परसेंट ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोवर्स, कॉकरोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळत की, तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय? आज माझ्यासारख्या युवकाला ते पाकिस्तानी म्हणताय, वेदांत जो 17 वर्षाचा आहे, ज्यांनी सीबीएससी पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं, त्याला पाकिस्तानी म्हणताय, जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणतायत, मी पाकिस्तानी सीबीएससीचे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तर मग भारतीय कोण? फक्त आयटी सेलवाले, काय चाललंय आपल्या देशात, असा सवाल देखील दीपके यांनी उपस्थित केला आहे.(Abhijeet Dipke CJP)

पुढे दीपके म्हणाले की, ती पेपर फुटी जी होती, पेपर लीक जी झाली होती ना त्याच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावायला पाहिजे होती, आम्हाला हे सगळं करायची गरज नाही पडणार, जर पेपर लीक नसता झाला जर सहा स्टुडंट्सनी आत्महत्या नसत्या केल्या आणि त्यानंतर जर धर्मेंद्र प्रंतप्रधानांनी जर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला असता, तर मला माझं अमेरिकमधली लाईफ सोडून याची काही गरज नसती पडली, मी तिथे खूष होतो, मी तिथे सेटल झालो असतो, असंही ते पुढे म्हणालेत.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

Comments are closed.