सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
सोलापूर विधान परिषद निवडणूक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहे. जसंजसं मतदानाची तारीख जवळ येईल तसंतसं महायुतीला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला विधानपरिषद उमेदवारीवरुन नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन आमदार उपस्थित असल्यानं खळबळ उडाली आहे. महायुतीच्या बैठकीला माढ्याचे शऱद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहे.
धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले
सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीची बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे आणदार उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला माढ्याचे शऱद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळ आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले आहेत. सोलापुरात महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित आहेत. केवळ मोहोळचे आमदार राजू खरे हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला आले नाहीत.
सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचं पारडं जड
शिवसेना शिंदे गटातर्फे खासदार ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह पदाधिकारी आहेत. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील आणि उत्तमराव जानकर दोघेही महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून नाराज होते. आज दोघेही भाजप महायुतीच्या बैठकीला उपस्थित आहेत. तर करमाळाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी या आधीच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. ते देखील आज या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4 पैकी 3 आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचं पारडं जड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या गटाचे आमदार बैठकीला गेल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच विधानपरिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील जाहीर केले होते. मात्र आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापुरात होत असातना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीये. दरम्यान सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आल्याने या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.