FBI चा बनावट कंपन्यांसह चीनला दणका; नोकऱ्यांचे खोटे आमिष दाखवणाऱ्या 13 वेबसाईट्स केल्या जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियाच्या या जगात नोकऱ्या शोधण्यासाठी तरुण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसेच अनेक कंपन्या सुद्धा सोशल मीडियावर जाहिरात करून तरुणांना संधी देत असतात. या सर्व प्रक्रियेत काही बनावट कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून अशा होतकरू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच बनवाट वेबसाईट्सवर FBI ने आणि अमेरिकन न्याय विभागाने कारवाई केली आहे. एकूण 13 वेबसाईट जप्त करण्यात आल्यात आहे. या वेबसाईट्स सल्लागार (कन्सल्टिंग) कंपन्यांच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना खोट्या नोकऱ्यांचे आमिष दाखवत होत्या.

न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या गुप्तहेर संघटनांशी संबंधित असलेल्या या कंपन्यांनी सुरक्षा मंजुरी असलेल्या आणि संवेदनशील सरकारी माहितीचा अ‍ॅक्सेस असलेल्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले होते. संशयितांनी हुबेहूब खऱ्या वाटणाऱ्या कंपन्या उभ्या करून ‘सिनियर अनालिस्ट’ आणि ‘इंटरनॅशनल अफेअर्स कन्सल्टंट’ अशा पदांच्या जाहिराती दिल्या होत्या, जेणेकरून अमेरिकेची गुप्त माहिती मिळवता येईल. TOI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हा फसवणुकीचा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झाला होता. आरोपींनी सोशल मीडिया, फ्रीलान्स प्लॅटफॉर्म्स (जसे की Upwork, Wellfound) आणि नोकरीच्या वेबसाईटचा वापर करून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना शोधले. स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी AI चा वापर करून तयार केलेले फोटो आणि खोट्या प्रोफाइल्सचा वापर केला. नोकरीच्या बदल्यात उमेदवारांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती देण्याची मागणी केली जात होती. तसेच, या कंपन्या खऱ्या वाटाव्यात म्हणून उमेदवारांकडून बळजबरीने गोपनीयतेचे करार देखील करून घेतले जात होते.

एफबीआयने (FBI) या सर्व 13 वेबसाईट्स जप्त करून त्या जागी कायदेशीर कारवाईचा चेतावणी देणारा संदेश लावला आहे. एफबीआयच्या सायबर विभागाचे विशेष अधिकारी डॅनियल विएरझबिकी यांनी सांगितले की, “चीनी सरकार बऱ्याच काळापासून खोट्या कंपन्या आणि नोकऱ्यांच्या आडून अमेरिकन कर्मचाऱ्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होते, ज्याला आम्ही आता पूर्णपणे खीळ घातली आहे.” अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन माध्यमातून मिळणाऱ्या अशा कोणत्याही संशयास्पद  नोकऱ्यांच्या ऑफरला बळी पडू नये आणि सतर्क राहावे.

Comments are closed.