उत्तम जानकरांचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा, मोहिते पाटलांविरोधातील राजकीय संघर्षाला सुरुवात
सर्वोत्तम माहिती: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीवरुन शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. महायुतीला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. माझी भूमिका मी स्पष्ट केलेले आहे. वसंत देशमुख यांना मी मतदान करणार नाही. त्यावरून माझा विश्वासघात झालेला आहे असं उत्तम जानकर यांनी सांगितलं आहे. माझ्या मुलाला उमेदवारी अर्ज दिलेला असताना त्यांनी गैरविश्वास दाखवून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जानकर म्हणाले.
जास्त काळ मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी राहू शकत नाही
माळशिरस तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मोहिते पाटलांची भूमिका सातत्याने अशीच राहिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शेकापमने मिळून राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. विधानसभेला मी आमदार होऊ नये यासाठी मोहिते पाटलांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी केली. जास्त काळ मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी राहू शकत नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील निर्णय करतात मात्र त्यांच्याच कुटुंबातील मागचे निर्णय फिरवतात असे जानकर म्हणाले. पक्षाने माझ्या मुलाचे नाव उमेदवार म्हणून फिक्स केले होते. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचे परिणाम हे आहेत असे जानकर म्हणाले.
रोहित पवार यांच्या पंढरपुरात होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मला माहिती नाही
रोहित पवार हे पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याबाबत जानकरांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्या आंदोलनासंदर्भात मला माहिती नाही.
विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला विधानपरिषद उमेदवारीवरुन नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन आमदार उपस्थित असल्यानं खळबळ उडाली आहे. महायुतीच्या बैठकीला माढ्याचे शऱद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळ आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले आहेत. सोलापुरात महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित आहेत. केवळ मोहोळचे आमदार राजू खरे हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला आले नाहीत.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.