वन डे वर्ल्ड कप 4 ऑक्टोबरपासून
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह तमाम देशवासीयांचे डोळे ज्या वन डे वर्ल्ड कपवर लागलेले आहेत त्याच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. वन डे वर्ल्ड कपला 4 ऑक्टोबर 2027 या दिवशी सुरुवात होईल तर 21 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाणार आहे. 31 मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत स्पर्धेच्या वेळापत्रकावर चर्चा झाली. आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा या वर्षी जुलैमध्ये होणार असून त्यावेळी अंतिम वेळापत्रक निश्चित केले जाईल.
दक्षिण आफ्रिका ४१ सामन्यांचे घटना करणार
या विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 54 सामने नियोजित असून त्यापैकी 41 सामन्यांचे आयोजन दक्षिण आफ्रिका करणार आहे. झिम्बाब्वे 8 ते 10 सामन्यांचे आयोजन करेल, तर नामिबिया 3 सामन्यांचे आयोजन करू शकते. या विश्वचषकात 14 संघ सहभागी होतील. दक्षिण आफ्रिका 2003 नंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. गेल्या दोन स्पर्धांमध्ये एकदिवसीय विश्वचषकात 10 संघांनी भाग घेतला होता, पण यावेळी 14 संघ सहभागी होतील. प्रत्येकी सात संघांचे दोन गट तयार केले जातील आणि प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ ‘सुपर सिक्स’साठी पात्र ठरतील.
Comments are closed.