FIFA World Cup 2026 – रोनाल्डोचे स्वप्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

1930 पासून सुरू झालेल्या विश्वचषकाच्या इतिहासात तब्बल 96 वर्षांत फक्त आठ देशांनाच विजेतेपद मिळाले आहे. पण यंदाचा विश्वचषक हा इतिहास बदलण्याची संधी घेऊन येत आहे. या स्पर्धेत ‘अनेक नवे दावेदार’ जगाला धक्का देण्यास सज्ज आहेत. सर्वाधिक लक्ष आहे ते ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालकडे. क्लब फुटबॉलपासून युरो विजेतेपदापर्यंत सर्व काही जिंकलेल्या रोनाल्डोच्या कारकिर्दीत विश्वचषक ट्रॉफीचाच अभाव आहे. त्यामुळे हा त्याचा शेवटचा आणि कदाचित सर्वात भावनिक प्रयत्न असू शकतो. पोर्तुगालबरोबरच नेदरलँड्स, मोरोक्को, सेनेगल, जपान, इक्वाडोर, तुर्किये आणि नॉर्वे हे संघही दावेदारी करत आहेत.

Comments are closed.