अवघ्या 700 रुपयांसाठी भारतीय बांगलादेशी होत आहेत.
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
केरळमधून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. केरळच्या विविध हिस्स्यांमध्ये जवळपास 10 हजार बांगलादेशी नागरिक बनावट ओळखपत्रांच्या मदतीने ‘स्थलांतरित कामगार’ म्हणून राहत आहेत. या मोठ्या अवैध नेटवर्कचा खुलासा पोलिसांनी कोल्लम जिल्ह्याच्या कोट्टारक्करामध्ये 10 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतल्यावर झाला आहे. राज्यात अनेक बांगलादेशी नागरिक अवैध स्वरुपात राहत आहेत आणि ते देखील खऱ्या भारतीय नागरिकांप्रमाणे. सर्वात मोठा खुलासा म्हणजे या बांगलादेशी नागरिकांनी केवळ 700 रुपयेखर्च करत अनेक बनावट भारतीय ओळखपत्रे प्राप्त केली आहेत.
घुसखोरीचे हे सत्र सर्वसाधारणपणे बांगलादेश सीमेपासून सुरू होते, हे लोक सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद यासारख्या भागांमध्ये पोहोचतात आणि तेथून प्रारंभिक बनावट दस्तऐवज तयार करवून घेतात, यानंतर चांगल्या रोजगाराच्या शोधात हे बांगलादेशी भारताच्या अनेक हिस्स्यांमध्ये विशेषकरून केरळमध्ये पोहोचतात. पश्चिम बंगालचे स्थलांतरित कामगार म्हणून केरळमध्ये पोहोचल्यावर हे लोक स्थानिक पत्त्यांचा वापर करत पूर्णपणे भारतीय ओळख धारण करतात आणि तेथेच स्थानिक होतात.
काही रुपयांमध्ये महत्त्वपूर्ण दस्तऐवज
केरळमध्ये या बांगलादेशी नागरिकांना केवळ 700 रुपये दिल्यावर आधारकार्ड आणि रेशनकार्ड यासारखे अतिमहत्त्वपूर्ण सरकारी दस्तऐवज उपलब्ध होत आहेत. या बनावट दस्तऐवजांयच मदतीने ते स्वत:ला भारतीय ठरवत आरामात राहत आहेत.
बेंगळूर येथील माफिया
या बनावट दस्तऐवजांमागे बेंगळूर येथून संचालित होणारे एक मोठे माफिया नेटवर्क असू शकते असा पोलिसांना संशय आहे. हे बनावट दस्तऐवज इतके अचूक असता की त्यांना पाहून खरे की खोटे हा फरक करणे अत्यंत अवघड असते. कोट्टारक्करामध्ये पकडण्यात आलेले लोक अनेक वर्षांपासून केरळमध्ये वास्तव्य करत होते. पोलिसांनी त्याचे मोबाइल तपासले असता त्यात बांगलादेशी पासपोर्टच प्रत दिसून आल्यावर वस्तुस्थिती उघड झाली. चौकशीत ‘चेन मायग्रेशन’चाही खुलासा झाला. जे लोक अनेक वर्षापूर्वी आले, ते स्वत:च्या नातेवाईकांना बोलावत आहेत, याचे उदाहरण मुगल खातून नावाची महिला असून ती 13 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या मार्गे केरळमध्ये पोहोचली होती, तिने ‘ममदास’ नावाने सर्व भारतीय ओळखपत्रं मिळविली आणि नंतर स्वत:च्या अनेक नातेवाईकांना केरळमध्ये बोलावून घेतले. तर अटक होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी ती बांगलादेशी पासपोर्टचा वापर करत दोन मुलांसोबत बांगलादेशात जाऊन आली होती.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका
केंद्रीय आणि राज्य गुप्तचर यंत्रणा या पूर्ण स्थितीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत मोठ्या धोक्याच्या स्वरुपात पाहत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील लोक या बनावट दस्तऐवजांचा वापर करत आहेत का याचा तपास आता प्रशासन करत आहे. तपास तीव्र झाल्याने आणि कठोर धोरण अवलंबिण्यात आलयाने अनेक बांगलादेशी आता केरळ सोडण्याची तयारी करत आहेत. अनेक भागांमध्ये स्थलांतरित कामगारांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे.
Comments are closed.