Jalna News- अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना जिल्ह्यातील अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गुरूवारी 11 जून रोजी दुपारच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

रुग्णालयासारख्या पवित्र आणि सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारची हिंसक घटना घडल्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकरणावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments are closed.