दिल्लीत जिमबाहेर गोळीबाराची घटना

प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावा याची जिम : लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली

वृत्तसंस्था/नवी दिल्ली,भोपाळ

दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात गुरुवारी सकाळी गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार झाला. यासंबंधीची माहिती मिळताच, पोलीस पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दिल्ली पोलीस गोळीबाराशी संबंधित माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. घटनेचा तपास सुरू केला असून प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावा हा जिमचा मालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या अनिल पंडितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनिल पंडितने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

Comments are closed.