Jaspal Rana Passes Away नेमबाजी खेळाडूंचा गुरु हरपला ! प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन
विख्यात नेमबाजी खेळाडू म्हणून तसेच प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे जसपाल राणा यांचं दु:खद निधन झाले. राणा हे माजी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते आणि दोन वेळचे ऑलिम्पिक पदक विजेते स्टार नेमबाज मनू भाकर यांचे प्रशिक्षक होते. वयाच्या ४९ व्या वर्षी राणा यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीहून परतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकारावरील उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राणा यांच्या परिवारात पत्नी रीना राणा, मुलगी देवंशी, मुलगा युवराज, वडील नारायण सिंह राणा, बहीण सुषमा सिंह आणि धाकटा भाऊ सुभाष राणा यांचा समावेश आहे.
उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक
Comments are closed.