‘महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद’, सुप्रिया सुळेंचे व्याही अरु
Arun Lakhani : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत असतानाच आता महात्मा गांधी यांच्याशीही त्यांची तुलना करण्यात येत आहे. भाजप नेते, उद्योजक आणि विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले अरुण लखाणी (Arun Lakhani) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करत एक विधान केल्यामुळे नव्या राजकीय चर्चांची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असलेल्या अरूण लखाणी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गांधीजींप्रमाणेच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.(Arun Lakhani)
अरुण लखानी पंतप्रधान मोदींवर : काय म्हणाले अरुण लखानी?
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अरुण लखाणी म्हणाले, “महात्मा गांधी उपवासाचं आवाहन करायचे आणि संपूर्ण देश ते पाळायचा. तशी क्षमता आणि तसाच आदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे. मोदींनी आवाहन केलं की लोक प्रतिसाद देतात. त्यांनी काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि लोकांनी इंधनाचा वापर कमी करण्यास सुरुवात केली, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.”
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या कुटुंबातील एका घटनेचा देखील उल्लेख केला. “मोदींच्या आवाहनानंतर आमच्या घरातूनही रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार २७ नोव्हेंबरला होणारा स्वागत समारंभ १६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पत्रिका छापून वाटल्या होत्या, त्यामुळे काही गोंधळ झाला. मात्र लग्न नियोजित वेळेतच होणार आहे,” अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
अरुण लखानी पंतप्रधान मोदींवर : मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक करताना लखानी म्हणाले.
“मोदींचा हा १२ वर्षांचा कालावधी भारतासाठी सुवर्णकाळ ठरला आहे. देशाचा विकास झाला, जगभरात भारताचा सन्मान वाढला. महिला, गरीब आणि वंचित घटकांसाठी राबवण्यात आलेल्या योजना क्रांतिकारी ठरल्या असल्याचं सांगत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.”
अरुण लखानी पंतप्रधान मोदींवर : काँग्रेस मागे का पडली? लखानी म्हणाले.
“महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ होते. त्यामुळे काँग्रेसला विजयाची आशा नव्हती. निवडणूक लढवून फायदा नसल्याने त्यांनी माघार घेतली,” असा दावा लखाणी यांनी केला.
अरुण लखानी वर पीएम मोदी : राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरणावर साधलं मौन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर होणार असल्याच्या चर्चांबाबतच्या प्रश्नावर बोलताना लखाणी यांनी सावध भूमिका मांडत म्हटलं की, “मी राजकारणात नवीन आहे. अनेक वर्षे राजकारणात असलेल्या लोकांनाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. त्यामुळे मी यावर भाष्य करणे टाळतो,” असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.