राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण : आगामी काळात भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणासंदर्भात बोलणी सुरु असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेस (Congress) हायकमांडने महाराष्ट्राचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. या दोघांशी काँग्रेस हायकमांड राष्ट्रवादीच्या (NCP) काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबत चर्चा करु शकते, असा अंदाज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्यातील नेतृत्वाकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चाचपणी सुरु असल्याचे समजते. (Maharashtra Politics news)
काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील काही प्रमुख मोजक्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विचारणा केल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मतं काय आहेत, याची चाचपणी केली जात आहे. अंतिम निर्णय जरी हायकमांड घेणार असले तरी राज्यातील नेत्यांची भूमिका काय आहे याची विचारणा काँग्रेस नेतृत्त्वाकडून महाराष्ट्रातील नेत्यांकडे केली जात आहे.
याशिवाय, विदर्भातील दोन आमदारांसह निवडक पदाधिकाऱ्यांनी (विकास ठाकरे व अमित झनक) दिल्ली येथे जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल व मुकुल वासनिक यांची भेट घेतल्याचे समजते. नुकत्याच झाल्या शहराध्यक्ष व जिल्हा अध्यक्षांना नेमणुकीवरून राज्यात नाराजीचे वातावरण आहे, याची माहिती त्यांनी हायकमांडला दिली. सोबत विदर्भातील विद्यमान राजकीय परिस्थितीची माहितीदेखील या दोन आमदारांकडून पक्षश्रेष्ठींनी घेतली.
Sanjay Raut on NCP Merger in Congress: राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये 15 ऑगस्टला विलिनीकरण? संजय राऊत म्हणाले…
राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण 15 ऑगस्टला होणार की नाही, याबाबत मी काही सांगू शकत नाही. प्रत्येक गटाला स्वतंत्र नेता आहे, इथे शरद पवार आहेत. हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. पण जर असे होणार असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ते जाणकार आहेत, जर काँग्रेस उभा केला तर आमच्यासारख्या प्रादेशिक पक्षाला बळ मिळेल. विषयाला वेगळी दिशा नको आता प्रादेशिक स्तरावर काँग्रेसला मजबूत करायचे आहे. मी एक भूमिका राष्ट्रीय स्तरावरची मांडली आहे , जर केंद्राच्या बकासुराशी लढायचे झाले तर मूळ पक्षांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
Shashikant Shinde NCP: नाना पटोले यांनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी, आमच्या पक्षाची काळजी आम्ही घेऊ; शशिकांत शिंदे यांचा टोला
काँग्रेसमध्ये पक्षविलिनीकरणाच्या चर्चांवरून राजकीय वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. “नाना पटोले यांनी आधी काँग्रेसची मूठ बांधावी, स्वतःचा पक्ष मजबूत करावा आणि राष्ट्रवादीची काळजी करण्याची गरज नाही,” असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चिंता करण्याऐवजी काँग्रेस पक्षाची काळजी घ्यावी. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी प्रथम स्वतःचा पक्ष एकत्र ठेवावा. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो, विलगीकरण किंवा पक्षविलीन करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. नाना पटोले यांनी असे विधान का केले, हे त्यांनाच माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट झाली होती. मात्र, त्यावेळी अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाली नव्हती.
शरद पवारांचा पक्ष संपला असे म्हणणारेच आज त्या पक्षाबद्दल बोलत आहेत, यावरून पक्षाचे महत्त्व दिसून येते. शरद पवारांच्या पक्षाच्या मागे जनतेचा मोठा पाठिंबा आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. प्रत्येकाने आपल्या पक्षाची चिंता करावी; आम्ही आमच्या पक्षाची काळजी घेण्यास सक्षम आहोत. शरद पवार पक्षाबाबतच वारंवार अशा चर्चा होतात, याचा अर्थ पक्ष भविष्यात अधिक जोमाने उभा राहणार आहे. सध्या विलगीकरण किंवा पक्षविलीनाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. आगामी काळात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आघाडी म्हणून संघर्ष सुरू ठेवणार, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
आणखी वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.