मुंबईच्या महापौर बाजूला बसल्या असताना किरीट सोमय्या प्रचंड संतापले, पत्रकारांना म्हणाले, ‘आधी म
किरीट सोमय्या: मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील महापौर दालनात बुधवारी एक अत्यंत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आढावा बैठकीसाठी आलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि पत्रकार यांच्यात वादावादी झाली. या वादानंतर सोमय्या पत्रकार परिषद (Press Conference) सोडून तरातरा निघून गेले. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत किरीट सोमय्यांवर ‘बिनपदाचे सुपर महापौर’ म्हणत जोरदार टीका केली आहे.
अखिल चित्रे यांनी एक्सवर एक व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, बिनपदाचे ‘सुपर महापौर’! मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय – ‘बिनपदाचे सुपर महापौर’ – नाव: किरीट सोमय्या! ना निवडणूक लढवली, ना जनतेने निवडलं, ना कोणतं अधिकृत पद; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात. काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं, पडद्यामागून सूत्र हलवणं आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला त्याची जागा दाखवली तेव्हा ‘सुपर महापौर’ साहेबांनी काय केलं? चक्क उठून निघून गेले! वाघ बनून बसलेले… कोल्ह्यासारखे पळाले, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधलाय.
बिनपदाचे ‘सुपर महापौर’!
मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय –
‘बिनपदाचे सुपर महापौर’ – नाव: किरीट सोमय्या!ना निवडणूक लढवली
ना जनतेने निवडलं
ना कोणतं अधिकृत पद ; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात!
काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं,… pic.twitter.com/Kk9vpIJe9U— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) 11 जून 2026
Kirit Somaiya: नेमका काय घडला होता प्रकार?
मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौरांचे दालन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल बुधवारी सकाळीच प्रशासनाला आला होता. त्यामुळे सर्वच प्रसारमाध्यमांचे लक्ष या वृत्ताकडे लागले होते. या धमकीच्या अनुषंगाने महापौरांची अधिकृत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी महापौर दालनाबाहेर थांबले होते. याचवेळी महापौरांकडे जन्म प्रमाणपत्राबाबतची आढावा बैठक सुरू होती. या बैठकीला माजी खासदार किरीट सोमय्याही उपस्थित होते.
बैठक संपताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कॅमेऱ्यासह दालनात गेले. महापौरांसमोर कॅमेरे आणि माईक लावत असतानाच किरीट सोमय्या यांनी “माझा बाईट आधी घ्या” म्हणून पत्रकारांना फर्मान सोडले. मात्र पत्रकारांनी महापौरांसमोरचे माईक हटवण्यास नकार दिला. यावरून किरीट सोमय्या आणि पत्रकार यांच्यात वादावादी झाली. महापौरांनी मध्यस्थी करत किरीट सोमय्या यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पत्रकारांनी थेट महापौरांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यामुळे सोमय्या तिथून रागावून निघून गेले. त्यांचा हा हट्ट प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या पालिकेच्या वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.