Pregnant Lady took her own life पतीला फिश करी आवडली नाही, पत्नीने पोटातल्या अर्भकासह स्वत:ला संपवलं

पतीला आपण बनवलेली फिश करी न आवडल्याने संतापलेल्या गरोदर पत्नीने गळफास घेत स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

‘सामना’च्या वृत्तानुसार तमिळनाडूमधील नामक्कल जिल्ह्यात ही घटना घडली असून मृत पत्नीचे नाव माधुरी विश्वकर्मा असून पतीचे नाव तिलक नायक असे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे मुळच  छत्तीसगढचे असून उदरनिर्वाहासाठी ते तमिळनाडू राज्यात राहत होते. वृत्तानुसार हे जोडपे रेशीम उत्पादनाचे काम करत होते.

तिलक आणि माधुरी यांच  प्रेमविवाह झाला होता. सकाळी जेवणासाठी माधुरी फिश करी बनवली होती मात्र तिलकला ही फिशकरी न आवडल्याने तो रागावून कामावर गेला. संध्याकाळ जेव्हा तो परतला तेव्हा त्याला माधुरीने गळफास लावल्याचे दिसले.

Comments are closed.