Dr. Sejal Pawar Controversy डोनरच्या प्रायव्हेट पार्टवर विनोद करणं डॉ. सेजलला चांगलंच भोवलं…होणार मोठी कारवाई

वैद्यकिय क्षेत्रात देहदान करणाऱ्या व्यक्तीच्या मृत शरीराला सन्मानाचे स्थान असते. मृत्यूनंतरही मृतदेह असा उल्लेख न करता डोनर किंवा दाता असा उल्लेख केला जातो. मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीसाठी डोनरचे शरीर लाखमोलाचे असते पण डॉ. सेजल पवारने केलेल्या भीभत्स विनोदामुळे चौफेर वादळ निर्माण झाले असून तिच्यावरच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सेजल पवारसाठी मोठी अडचण

३७० रुपयांची बिर्याणी आणि एका स्टँड-अप कॉमेडी शोमधून सुरू झालेला वाद आता केईएम मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवारसाठी एक मोठी समस्या बनत आहे. कॉमेडी शो दरम्यान तिने केलेल्या काही वक्तव्यांनी इतके मोठे स्वरूप धारण केले की, हे प्रकरण कॉलेज प्रशासनापर्यंत पोहोचले. आता तिच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची चर्चा आहे.

कॉमेडी शोच्या वक्तव्यामुळे वाद वाढला.

खरं तर, प्रणित मोरेच्या स्टँड-अप शो दरम्यान डॉ. सेजल पवार यांनी अवयवदान आणि मृतदेहांबद्दल काही टिप्पणी केली होती. या टिप्पणीवर प्रेक्षकांनी आणि सोशल मीडियावर लोकांनी आक्षेप घेतला. अशा संवेदनशील विषयांवर अशा प्रकारे चर्चा करणे अनुचित असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे.

महाविद्यालय प्रशासनाने दखल घेतली

प्रकरण चिघळल्यानंतर, केईएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने ते गांभीर्याने घेतले आहे. महाविद्यालयाने एक दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून, या संपूर्ण प्रकरणावर अहवाल तयार करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली आहे. हा अहवाल लवकरच प्रशासनाला सादर केला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉ. पवार हिच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईचा निर्णय घेतला जाईल . त्यांना काही कालावधीसाठी महाविद्यालयातून निलंबित केले जाऊ शकते, असे मानले जात आहे. अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल.

कॉलेजने कुटुंबाला बोलावले

महाविद्यालय प्रशासनाने केवळ विद्यार्थिनीलाच नव्हे, तर तिच्या पालकांनाही बोलावले आहे. पुढील कारवाईबाबत कोणताही अंतिम निर्णय झाल्यास, तो थेट कुटुंबाला कळवला जाईल अशी अपेक्षा आहे.

₹३७० च्या बिर्याणीचा वाद काय आहे?

हा सगळा वाद शोमधील एका सेगमेंटमधून सुरू झाला, ज्यात एका दर्शकाने त्याच्या डेटबद्दलचा एक किस्सा सांगितला. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याने कोणासाठी तरी ३७० रुपयांची बिर्याणी विकत घेतली आणि त्या बदल्यात त्याला काहीशा आश्वासक प्रतिक्रिया मिळाल्या. बिर्याणीनंतर थेट शरीरसंबंध असा थेट सूर या दर्शकाच्या बोलण्यातून दिसत होता.

यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी याला महिलांचा अपमान म्हटले आणि कोणावर पैसे खर्च करणे म्हणजे बदल्यात काही अपेक्षा ठेवणे नव्हे, असे सांगितले.

Comments are closed.