इंग्लंड दौऱ्यादरम्यान केन विल्यमसनचा मोठा निर्णय; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!

जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson announced retirement from International cricket) इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स टेस्ट सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 16 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विल्यमसनने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने एकूण 19,346 धावा केल्या असून, त्याच्या नावावर 48 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

याआधीच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केले आहे. आपल्या निवृत्तीच्या निवेदनात विल्यमसन म्हणाला, “मी बऱ्याच काळापासून याचा विचार करत होतो आणि गेल्या काही दिवसांत मला जाणीव झाली की, आता हीच योग्य वेळ आहे. मला नेहमीच माझ्या देशासाठी खेळायचे होते आणि मी जेवढेही सामने खेळलो, त्यात मी माझे 100 टक्के योगदान दिले याचा मला आनंद आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की, मला माझ्या अटींवर निवृत्ती घेता आली. न्यूझीलंडच्या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि टीमचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. या संघाचा दीर्घकाळ भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ही आठवण माझ्या कायम स्मरणात राहील.

विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2019 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती आणि तो स्वतः ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. तसेच, 2019 मध्ये त्याला ‘आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ हा बहुमानही मिळाला होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 9,515 वनडेमध्ये 7,256 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,557 धावा आहेत. विशेष म्हणजे, त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पहिली ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (WTC) जिंकली होती.

कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीची आकडेवारी पाहिली तर, विल्यमसनने तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. कसोटीमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली न्युझीलँडने 40 सामन्यात 22 विजय मिळवले असून 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तसेच 8 सामने आणि अनिर्णित राहिले होते. तसेच वनडेमध्ये 91 सामन्यात 46 विजय, 40 पराभव, 1 टाय आणि 4 सामने रद्द झाले होते. याचबरोबर टी20 मध्ये त्याने एकूण 75 सामन्यात न्यूझीलंडच नेतृत्व केलं आहे ज्यामध्ये 39 विजय, 34 पराभव, 1 टाय, 1 अनिर्णित सामन्यांचा समावेश होता.

Comments are closed.