मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बरळली, डॉ. सेजल पवारला हाकलणार का? KEM चे डीन म्हणाले….

केईएम हॉस्पिटलचे डीन डॉक्टर सेजल पवार यांची वादग्रस्त टिप्पणी: ‘370 रुपयांची बिर्याणी’ या व्हायरल व्हिडीओनंतर (Viral Video) कॉमेडियन प्रणित मोरेच्या (Comedian Pranit More) शोमधील आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर सेजल पवार (Doctor And Influencer Sejal Pawar) यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून (Objectionable Remark) सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता. वाढत्या वादानंतर डॉक्टर सेजल पवार (Doctor Sejal Pawar) यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. पण, रोष काही कमी झालेला नाही. तर, प्रणित मोरे बिर्याणीचं वक्तव्य करणारा हिंमांशु जांगडा आणि मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर बोलणारी डॉक्टर सेजल पवार या तिघांच्याही अडचणींत मोठी वाढ झाली आहे. तसेच, सेजल पवार व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर आता केईएम रुग्णालयानं चौकशीचा बडगा उगारला आहे.

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील वक्तव्य केल्या प्रकरणी सेजल पवार ज्या रुग्णालयात लास्ट ईयरचं शिक्षण घेतेय, त्या KEM रुग्णालयानं याप्रकरणी सखोल चौकशीचे निर्देश देत, चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर कारवाई केली जाईल, असं रुग्णालयाच्या डीनचं म्हणणं आहे.

केईएम रुग्णालयाकडून चौकशी समितीची स्थापना (KEM Hospital Sets Up Inquiry Committee)

केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसची विद्यार्थिनी सेजल पवार हिच्याशी संबंधित व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीनं तपास प्रक्रियेला गती दिली आहे. या समितीत पदवीपूर्व वसतिगृहाच्या वॉर्डन आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता चालक, तसेच मेडिसीन विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रद्धा मोरे यांचा समावेश आहे. डॉ. मोरे या केईएमच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीनं त्या कार्यक्रमाचं संपूर्ण रेकॉर्डिंग तपासलं आहे. याच कार्यक्रमातून तो दोन मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ तयार झाला होता. सोशल मीडियाच्या वापराबाबत नॅशनल मेडिकल कमिशनच्या (NMC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही चौकशी केली जात असल्याचं समजतंय. या तपासाचा अहवाल केईएम हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांकडे (Dean) सादर केला जाणार आहे, त्यानंतरच योग्य ती पावलं उचलली जातील, असं अधिष्ठात्यांचं म्हणणं आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर, या प्रकरणातील पुढील कारवाईबाबतचा निर्णय अधिष्ठात्यांच्या स्तरावर घेतला जाईल.

केईएम रुग्णालयाचे डीन काय म्हणाले? (KEM Hospital Dean On Sejal Pawar)

प्रणित मोरे शोमधल्या डॉक्टर सेजल पवार हिच्या व्हायरल व्हिडीओ क्लिपवर आता केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हरीश पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सेजल पवारला काढून टाकणार का? यावर KEM रुग्णालयाचे डीन म्हणाले की, “डॉ. सेजल पवार हीच स्टेटमेंट घेतलं आहे… तिनं परवानगी घेऊन ती घरी गेली आहे… असं थेटपणे तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची कारवाई करता येणार नाही, यामध्ये MUHS, DMER, NMC अशा विविध ऑथॉरिटीच म्हणणं सुद्धा जाणून घ्यावं लागेल, आम्हाला आमचा महाविद्यालयचा रिपोर्ट द्यावा लागेल, मगच आम्हाला अॅक्शन घेता येईल…”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KEM Hospital Dean On Sejal Pawar Viral Video: प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजल पवार नको ते बोलली, KEM रुग्णालयाकडून महत्त्वाचं पाऊल, डीन म्हणाले, तो Viral Video…

एबीपी माझाच्या बातम्या LIVE :

Comments are closed.