धक्कादायक! पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार, पोलीस घटनास्थली दाखल
पालघर क्राईम न्यूज: पालघर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
तरुणी गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरु
गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी तिला पुढे शहरातील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदर तरुणी ही पालघरच्या महसूल खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड आणि पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.