Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?

Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?

अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखात्याची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवली. मात्र अर्थमंत्रिपदाची खुर्ची पुन्हा एकदा आपल्याला मिळावी अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे.. पण अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं सूचक वक्तव्य पाहता, राष्ट्रवादीची इच्छा पूर्ण होणार की त्यांना इच्छेवर पाणी सोडावं लागणार असा प्रश्न उपस्थित झालाय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखातं स्वतःकडे घेतलं.कारण देण्यात आलं, ते म्हणजे तोंडावर असलेला अर्थसंकल्प.. अजित पवारांच्या निधनाला चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी,  तर अर्थसंकल्प सादर करून तीन महिने लोटले आहेत. त्यामुळे हयात असताना अजितदादांकडे असेलेलं अर्थखातं, राष्ट्रवादीला परत मिळणार? की देवेंद्र फडणवीस ते स्वतःकडे किंवा भाजपकडेच ठेवणार? या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अजितदादांची राष्ट्रवादी आहे.अर्थखात्याच्या भविष्याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी वर्तमानावर बोट ठेवत मोठं सूचक वक्तव्य केलंय.आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे…देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा राजकीय विश्लेषकाकडून जो अर्थ काढला जातोय,तसं खरंच घडणार असेल तर राष्ट्रवादीनं अर्थखात्याची आशा सोडून द्यायची का? असा सवाल उपस्थित होतोय.मध्यंतरी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीत सुनेत्रा पवारांनी अर्थखातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे असा सूर आळवला.मात्र अर्थखातं परत आपल्याला मिळावं, यासंदर्भात सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांशी थेट संवाद साधलाय का?
हे तपासावं लागेल.आज तरी अर्थखातं माझ्याकडे आहे असं छातीठोकपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना…सुनेत्रा पवार आणि त्यांचे सहकारी, पुन्हा एकदा अर्थमंत्रिपदाची खुर्ची राष्ट्रवादीला सोपवण्यासाठी तयार करू शकतील का?कारण प्रश्न फक्त अर्थमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या आणि मलईदार खात्याचा नाही आहे…तर अजित पवारांच्या निधनानंतर, महायुतीत राष्ट्रवादीचं स्थान आणि स्वाभिमान अढळ ठेवण्याबाबतचा आहे

Comments are closed.