गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत; परभणीच्
परभणी अपघाताची बातमी: परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा मधून एक अतिशय खळबळपालक बातमी समोर आली आहे. यात गोदावरी नदीत (Godavari River) अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या चुलत बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहळा येथील उत्कर्षा उत्तम जाधव (वय 18) व समीक्षा उत्तम जाधव (वय 16) या दोन्ही बहिणी आज (14 जून) सकाळी गावाजवळील गोदावरी नदीकाठी आंघोळीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्या दोघी पाण्यात बुडाल्याची माहिती गावातील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली. (Parbhani Accident News)
दरम्यानघटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. दरम्यान, मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या त्यांची चुलत बहीण सिंधू दत्ता जाधव (वय 45) याही पाण्यात बुडाल्या. ग्रामस्थांनी तिघींचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तिघींचे मृतदेह पुढील तपासणीसाठी सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोहळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Accident News: गोव्यातील दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावांसह चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
गोव्यातील कुळे येथे दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार आयआयटी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गोव्यातील वास्को येथील आयआयटी मध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रेल्वेने वास्को ते कुळे असा प्रवास करुन आले. कुळेमधील मेतवाडा येथील दूधसागर नदीत हे विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच नदीचा प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे चारही विद्यार्थी पाण्यात अडकले. दुर्दैवाने यात चौघांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या शोधकार्यानंतर या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली.
कुळे पोलिसांनी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या युवकांची ओळख पटवली असून रामण्णा परसू मदार (वय १९, रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव), लक्ष्मण परसू मदार (वय १९, रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव), हिरण्णा परसू मदार (रा. आदर्श नगर, चिखली, मुरगाव) आणि विजय साजिली (रा. न्यू वाडा, गणेश मंदिराजवळ, वास्को). विजय हा झुआरीनगर येथील वसंत जोशी कॉलेजचा विद्यार्थी होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.