Ratnagiri News – हर्णे हल्लाप्रकरणातील आरोपींची जामीनावर मुक्तता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात दोन युवकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींसह एका अल्पवयीन मुलाची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी झेन हुनेरकर (२२), मूफिज सोलकर ( २३), सलाह कोंडविलकर (१९), नाबील काझी (१९) आणि जैब जमादार (२०) यांना अटक केली होती. तसेच एका अल्पवयीन मुलाचाही या प्रकरणात समावेश होता.

विनय सुधीर गुरव (रा. हर्णे गुरववाडी, ता. दापोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेंद्र हरिश्चंद्र खेडकर (रा. पाजपंढरी, ता. दापोली) यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींच्या वतीने खेड येथील प्रख्यात वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, खेड येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोपींना जामीन मंजूर केला असून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Comments are closed.